माझ्या लहानपणीची दिवाळी

NOTE: Writing this blog in my native language – Marathi. There is no way I could have Transcribed these emotions which are close very close to my heart in any other language.

दिवाळी म्हटलं की उत्साह , एक मोठा सण साजरा करण्याचा आनंद आपोआपच डोकावून जातो.

यावर्षी विशेष म्हणजे पुण्या मध्ये स्वतःच्या घरातली ही पहिली दिवाळी! त्यासाठी आठवडाभर सुट्टी घेतली पण दुर्दैवाने सुट्टीची सुरुवातच आजाराने झाली आणी सगळा जोश मावळला. सहज डोक्यात विचार आला दिवाळी ची खरी मजा नक्की काय असते ? आपण जसे मोठे होत गेलो तस दिवाळी आणखी एक सण बस पार पाडायचा , एवढच उरल का ? दिवाळी या नावाची पुसटशी का होईना excitement अजूनही मला वाटते ती का आहे ?

या सगळ्या प्रश्नांचे उत्तर फक्त एकाच गोष्टीकडे इशारे करत होते ते म्हणजे माझ्या लहानपणीची दिवाळी !!!

अस काय special होत त्या दिवाळी celebration मध्ये ? आणी सगळ्या आठवणी ताज्या झाल्या !

आमचं प्रत्येक दिवाळी celebration हे आमच्या आजी-आजोबांच्या गावी उपळ्याला व्हायच. आजी-आजोबा (आबई-बापू ) , आई-पप्पा आणी आम्ही चौघी बहिणी अशी आमची मैफील असायची. आम्ही सगळ्या मुली पण आमच्या आजी-आजोबा आणी आई-पप्पा नी आम्हाला ‘म्हारी छोरीया छोरो से कम है के’ म्हणत वाढवले.

आमच छोटस घर शेतात होत. घरासमोर हिरवंगार शेत , पाण्याने भरलेली विहीर , पेरू , बदाम , नारळाची झाडे , फुलांची झाडे , मोठं अंगण , गाई-म्हशी , नरसोबाचं मंदीर. हिवाळ्याच्या बोचऱ्या थंडीची नुकतीच सुरुवात झालेली असायची आणी शेतात घर असल्यामुळे ती थंडी अजूनच जाणवायची.

आम्हा बहिणीची दिवाळीची सुरुवात म्हणजे फटाके आणणे. बापू , ताई आणी मी फटाके आणायला तालुक्या च्या गावी उस्मानाबाद ला जायचो. बापू आम्हाला सगळ्या प्रकारचे फटाके घ्यायला लावत. सुतळी बॉम्ब , फुलबाजे , टिकल्या ,लक्ष्मी तोटे , अनार , भुईचक्र आणी बरच काही.

इकडे आमचा फटाके घेऊन दिवाळी चा शुभारंभ होत असताना तिकडे आई आणी आबई ची फराळाची तयारी सुरु झालेली असायची. आम्ही सगळे बापू सोबत बसून सगळ्या फराळाची चव चाखून आमचे expert opinion देण्याच काम करायचो. बापू खूप foodie होते so त्यांना सगळ perfect लागायच. बिचाऱ्या आई आणी आबई दिवाळी म्हणजे काम काम आणी काम असायच त्यांच्यासाठी. पण चुलीवर बनवलेल्या त्या फराळाची चवच न्यारी असायची!आणी काही traditions तर अगदी ठरलेल्या असायच्या जस की , करंजी ही पहाटे उठून च बनवली जायची 🙂

दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आमची ठरलेल्या सुतळी बॉम्ब च्या आवाजाने उठण्या पासून होत असे , बापू किंवा पप्पा तो बार उडवत असत. मग आम्ही थंडीमध्ये पांघरूण मधून बाहेर यावं ही वाटत नसताना बापूंना घाबरून पटकन उठून पहिलं शेकोटी जवळ बसायचो. बापूनी पहाटे पहाटे कीर्तन आणी भीमसेन जोशींची भक्तिगीते रेडिओ वर लावलेली असायची. उठल्यावर दुसर सगळ्यात आवडत काम म्हणजे अंगणातील पारिजातक च झाड हलवून तो सुवासीक पांढऱ्या फुलांचा सडा अंगावर पाडायचा. सकाळी आमची यासाठी शर्यत लागायची.

दिवाळी चा पहिला दिवस नरक चतुर्दशी , सूर्योदयापूर्वी जर अंघोळ नाही केली तर नरकात जाणार असं आम्हाला लहानपणी शिकवलेले , आणी ते कदाचित लहान असताना खरही वाटायच . दिवाळी ची अंघोळ ही शाही असायची , आई आणी आबाई सगळ्यांना अंघोळ घालणार , उटणं लावून , मोती साबण (फक्त आणी फक्त मोती च साबण बरं का ) , आणी आम्ही नहानी मध्ये प्रत्येकाच्या अंघोळी च्या वेळी फुलबाजे उडवून अजून शाही बनवणार. दिवाळीचा पाडवा हा विशेष दिवस , त्यात पत्नी आपल्या पती ला ओवाळते आणी पती गिफ्ट देतात . पण आमच्या घरी आम्ही सगळे बच्च पार्टी पण पप्पा आणी बापुंना ओवाळायचो आणी आम्हाला ही गिफ्ट मिळायचं.

अंघोळीचा कार्यक्रम झाला की सडा – रांगोळी , आणी आबई शेणाच्या गवळणी करायची . आमचा सगळ्यात आवडता होता पेंद्या .

अंघोळ , सडा रांगोळी झाली की मग ठरलेला नाश्ता ..शीरा , भजी , पापड , फराळाचे पदार्थ , करंजी तुपासोबत . अंगणात मस्त पैकी बाज टाकून , कोवळ्या सकाळच्या उन्हात बसून , गप्पा मारत नाश्त्याची मजा घ्यायची. महाभारत , रामायण च्या गोष्टी बापू आम्हाला अगदी लहानपाणी पासून सांगत आले ,त्यांचं वाचन अगाध होत. आणी प्रत्येक दिवाळीला भरपूर दिवाळी अंक आणायचे बापू.. गंमत-जम्मत , चारचौघी , गृहलक्ष्मी , आवाज , जत्रा , पप्पांचा आवडता त्यातला आवाज दिवाळी अंक.

संध्याकाळ झाली की फटाके उडवण्याचा कार्यक्रम. गवळणी च्या पेंद्या च्या पोटात लक्ष्मी तोटा उडवणे हे पण ठरलेले. लक्ष्मीपूजन च्या दिवशी फटाक्यांची आतिषबाजी व्हायची. याच दिनक्रमात २-३ दिवस चुटकीसरशी निघून जायचे. मग भाऊबीज आली की मामाच्या गावाला प्रस्थान आणी पुढची दिवाळी तिथे continue. माझे चार मामा आणि त्यांची joint family आणी सगळे cousins आमच्या वयाचे मग एकदम दंगा असायचा . सगळे भाऊबीजे ला आत्यांची म्हणजे माझ्या आई ची आतुरतेने वाट बघायचे. आत्यांचा चिवडा अगदी famous होता मामाच्या गावाला. मामा पण भाच्यांचे खूप लाड करायचे.

Typical सेलेब्रेशन , ना मोठेपणा ना दिखावा , पण त्यात एक excitement होती , full family celebration असायचं , सगळे मनापासून enjoy करायचे , आजी-आजोबांना नातवांसोबत आणी नातवांना आजी – आजोबांसोबत दिवाळी करण्याचं सुख आणी अप्रूप होतं.

आता आम्ही मोठे झालो , ना ते गावाचं घर राहील ना आजोबा राहिले.. आता दिवाळी म्हणजे शहरातला चार भिंतीतला सण राहिला , family celebration ही एका सुरात होत नाही , कोणी excite असत , कोणी नसत , कोणासाठी हा रोजचाच एक दिवस असतो , कोणाला झोप प्यारी तर कोणी अभ्यासात बिझी , कोणाला कामातून वेळच नाही , फराळात ही आधीची मजा नाही. घरातले म्हातारेच अजूनही उत्साह दाखवून परंपरा जपण्याचा प्रयत्न करतात आणी यंग जनरेशन जी आता मोठी झाली आहे ती मात्र I don’t care म्हणत चला सण म्हणजे सुट्टी आरामात enjoy करणे एवढेच उरले.

कधी कधी वाटत ते दिवस परत यावे , त्या लहानपणीच्या आठवणी आणी ती दिवाळी परत एकदा तरी सगळ्यांनी तशीच साजरी करता यावी .


3 thoughts on “माझ्या लहानपणीची दिवाळी

Leave a comment